सोलापूर : राज्यातील जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस अंमलदारांची माहिती गृह मंत्रालयाने मागविली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ११७ तर राज्यभरातील सुमारे आठ हजार १०० पदे आहेत.
नववर्षात पोलिस भरतीस प्रारंभ होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी पोलिस भरती झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून दरवर्षी पोलिस भरती होत आहे. गतवर्षी १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती झाली.
राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा भरतीचे नियोजन केले आहे. त्यानुसार जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या अंदाजे आठ हजार पदांची भरती नववर्षात होणार आहे. सध्या मागच्यावेळी भरती झालेल्यांचे जूनपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे.
फेब्रुवारी २०२७ मध्ये या नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण संपणार आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून नवीन पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भरतीचे संभाव्य नियोजन ८, १०० एकूण रिक्त पदे १ ते ३१ डिसेंबर २०२६ भरतीसाठी अर्जाची मुदत १ जाने. ते ३१ मार्च २०२७ भरतीला सुरवात
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.