सांगली: पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथील एस.एन.सी.यू./एन.आय.सी.यू. विभागात अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच ऑक्सिजन पाईपलाईन व विद्युतविषयक कामेही करण्यात येणार आहेत. ही कामे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, त्यासाठी अंदाजे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. या कामामुळे या कालावधीत रुग्णालयातील एस.एन.सी.यू./एन.आय.सी.यू. विभाग बंद राहणार असल्याचे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. या कालावधीत रूग्णालयातील एस.एन.सी.यू./एन.आय.सी.यू. विभागातील तसेच स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील जोखमीच्या रुग्णांवरील उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुरू राहणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.