सांगली : सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयामध्ये दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
समिती कार्यालयास प्राप्त होणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अधिनियम 2000 व नियम 2012 नुसार कार्यवाही करून परिपूर्ण प्रकरणात विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. त्रुटी असलेल्या प्रकरणांमध्ये अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर त्रुटी अवगत करून देण्यात येतात. ज्या प्रकरणात अभिलेख तपासणी आवश्यक आहे, अशा प्रकरणांमध्ये संबंधित शाळा, तहसीलदार व आस्थापना यांना पत्र देऊन सत्यता पडताळणी अहवाल सादर करण्याबाबत अवगत करण्यात येते.
त्रुटी असलेल्या प्रकरणांकरिता ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रयोजननिहाय त्रुटी पूर्तता विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संबंधित सर्व विद्यार्थी, अर्जदार व उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात समक्ष उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगलीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चव्हाण यांनी केले आहे.विशेष मोहिमेचे प्रयोजननिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे : शैक्षणिक प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता करण्याची विशेष मोहीम 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी अभिलेख सत्यता पडताळणी मोहीम 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणार आहे. सेवा प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता व अभिलेख सत्यता पडताळणी मोहीम 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत, तर निवडणूक प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता व अभिलेख सत्यता पडताळणी मोहीमही 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.