🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलबांधकामादरम्यानच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही - अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बांधकामादरम्यानच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही - अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव


सांगली: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील कमानीचे बांधकाम सुरू आहे. आज दुपारी 1 वाजता कमानीचा आडवा बीम भरत असताना स्लॅप बीम अचानक ढासळला. या घटनेत कमानीचा बीम भरत असलेले कामगार पडले. त्वरित उपलब्ध जे.सी.बी. व्दारे आडव्या बीमचा मलबा हटवून अडकलेल्या कामगारांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या घटनेतील जखमी 7 कामगारांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या सात कामगारांपैकी पाच कामगारांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. उर्वरित दोघांपैकी एका कामगाराच्या मणक्याला दुखापत झाली असून, एका कामगाराच्या डोक्याला किरकोळ स्वरूपाची जखम झाली आहे. सर्व जखमी कामगारांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेत कोणत्याही स्वरूपाची कामगारांची जीवितहानी झालेली नसल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.