🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाळवा-शिराळा दुष्काळातून गायब! शासन निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक; स्वाभिमानीचा २४ परगणा आंदोलनाचा इशारा:, भागवत जाधव

वाळवा-शिराळा दुष्काळातून गायब! शासन निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक; स्वाभिमानीचा २४ परगणा आंदोलनाचा इशारा:, भागवत जाधव 


ईश्वरपूर:- रपूर ​सांगली जिल्ह्यात पावसाच्या तीव्र तूटमुळे खरीप पिकांची पार धुळधाण झाली असतानाही, शासनाने वाळवा आणि शिराळा तालुक्यांना दुष्काळी यादीतून जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. "शेतकऱ्यांवर झालेला हा अन्याय सहन केला जाणार नाही. शासनाने तातडीने दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास सरकारविरोधात तीव्र जनआंदोलन उभारू," असा इशारा स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव यांनी दिला आहे.

​राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून कर्जवसुलीस स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलात १००% सूट आणि परीक्षा शुल्क माफीसारख्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या तालुक्यांना यात स्थान मिळाले असले, तरी वाळवा आणि शिराळा तालुक्यांवर मात्र गदा आणली आहे. या पक्षपाती धोरणामुळे संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ; उपसा बंदीमुळे बळीराजा उद्ध्वस्त

वाळवा तालुक्यात पावसाच्या खंडामुळे ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन, हळद आणि केळी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भाताच्या पिकावर नांगर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच, कोयना आणि वारणा धरणांत पुरेसा पाणीसाठा असतानाही नदीपात्रातून उपसा बंदी लादून नदीकाठच्या पिकांचा गळा घोटल्याचा थेट आरोप भागवत जाधव यांनी केला. 

२८ सप्टेंबरला तहसीलदारांवर धडकणार; निवडणुकीत फिरू न देण्याचा इशारा
या अन्यायाविरोधात सोमवार, २८ सप्टेंबर रोजी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, वाळलेल्या पिकांचे पुरावेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडले जाणार आहेत.

​पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः दोन्ही तालुक्यांत येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करावा. अन्यथा आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या प्रतिनिधींना तालुक्यात पाऊलही ठेवू दिले जाणार नाही, असा सडेतोड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.