🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकशाहीवर घाला की आक्रमक पवित्रा? डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, व्हाईट हाऊसमधील वृत्तवाहिनींचे थेट प्रसारण रोखले!

लोकशाहीवर घाला की आक्रमक पवित्रा? डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, व्हाईट हाऊसमधील वृत्तवाहिनींचे थेट प्रसारण रोखले!


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. इराण युद्ध, वादग्रस्त इमिग्रेशन, H-1B व्हिसा, आयात शुल्क अशा अनेक मुद्यांवर डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळी वक्तव्य करत असतात. या घडामोडी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक प्रसारमाध्यमांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 
अमेरिकेतील आघाडीच्या आणि जगप्रसिद्ध 'सीएनएन' (CNN), 'एमएस नाऊ' आणि 'पॉलिटिको' या वृत्तसंस्थांना डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्तसंस्थांवर एकांगी वार्तांकन आणि 'फेक न्यूज' पसरवल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या वृत्तसंस्थांना 'व्हाईट हाऊस'मध्ये बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेतील जवळपास सर्वच वृत्त वाहिन्यांनी, टीव्ही नेटवर्कनी व्हाईट हाऊस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बातम्यांचं प्रसारण तात्काळ थांबवलं आहे. त्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून या वादाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

दरम्यान, अमेरिकेतील आघाडीच्या 'सीएनएन', 'एमएस नाऊ' आणि 'पॉलिटिको' या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसने प्रवेश नाकारल्यानंतर अमेरिकेतील इतर जवळपास सर्वच वृत्त वाहिन्यांनी 'व्हाईट हाऊस'च्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बातम्यांचं प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर ज्या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसमध्ये बंदी घालण्यात आली, त्या वृत्तसंस्थांनी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध थेट खटला दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसारमाध्यमांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं होतं?
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून वृत्तसंस्थांवर जोरदार हल्लाबोल केला होता. देशात प्रामाणिक आणि सत्य वार्तांकन झालं पाहिजे, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. जर इतर माध्यमांनी आपली भूमिका बदलली नाही, तर त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

"मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, सातत्याने खोट्या बातम्या देणाऱ्या सीएनएन, पॉलिटिको या संस्थांवर व्हाईट हाऊसमधून तात्काळ बंदी घातली जात आहे. ट्रम्प प्रशासन किंवा अमेरिकेबद्दल वृत्त देताना माध्यमांना कपोलकल्पित गोष्टी आणि खोटी माहिती पसरवण्याचा अधिकार नाही", असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.