🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेत पॅचवर्कच्या नावाखाली दरोडा! सभापती अन् ठेकेदार संगनमताने जनतेला लुटतायत; विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा घणाघात ​

सांगली महापालिकेत पॅचवर्कच्या नावाखाली दरोडा! सभापती अन् ठेकेदार संगनमताने जनतेला लुटतायत; विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा घणाघात  


सांगली :- सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांच्या पॅचवर्क कामाच्या नावाखाली सत्ताधारी सभापती आणि ठेकेदारांनी संगनमत करून महापालिकेच्या निधीवर दरोडा घातल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला. शहरातील रस्त्यांची दैना झाली असून, रस्ते खड्डेमय असताना कागदावर टेंडर काढून जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे, असा आक्रमक पवित्रा चव्हाण यांनी घेतला.  
​२७ कोटींच्या कामात डबलबार टेंडर: महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी दोष दायित्व कालावधी (DLP) अंतर्गत मागील ३ वर्षांत तब्बल २७ कोटींची कामे झाली आहेत. नियम नियमानुसार, या कालावधीत रस्त्यांची निगा आणि पॅचवर्क करण्याची पूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारांचीच असते. फक्त कागदावर ३ वेळा टेंडर: मूळ ठेकेदारांकडून कामे करून न घेता महापालिकेने एकाच रस्त्यावर पुन्हा पुन्हा ३ वेळा पॅचवर्कची टेंडर काढली. हे टेंडर प्रत्यक्ष रस्त्यावर न होता केवळ कागदावरच काढले गेले आहेत.

अतिरिक्त आयुक्तांना दिला इशारा: हा गैरप्रकार तातडीने थांबवण्यासाठी मंगेश चव्हाण सकाळी आयुक्तांना भेटायला गेले होते. आयुक्त अनुपस्थित असल्याने त्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवण्याचा कडक इशारा दिला.

​प्रशासन आणि पालकमंत्र्यांवर निशाणा: महापालिका प्रशासन हे पूर्णपणे स्थायी समिती सभापती आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. विरोधकांनी सवाल उपस्थित केल्यावरच प्रशासन जागे होते. तसेच या गंभीर प्रकाराकडे पालकमंत्र्यांचे कसलेही लक्ष नसून त्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.