🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'बाप्पा' तुझ्या मंदिरात रोषणाई, पण तिच्या वाटेवर काळोख! गरोदर मातेला ७ किमी झोळीतून वाहण्याची नामुष्की कधी हटणार?

'बाप्पा' तुझ्या मंदिरात रोषणाई, पण तिच्या वाटेवर काळोख! गरोदर मातेला ७ किमी झोळीतून वाहण्याची नामुष्की कधी हटणार?


वाण्याविहिर (जि. नंदुरबार) : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असताना... दुर्गम भागांवरील असुविधांचे विघ्न कधी दूर होणार... असा प्रश्न कायम आहे. सातपुड्यातील वेहगी बारीपाडा, ता. अक्कलकुवा येथील ग्रामस्थांची फरफट अद्यापही सुरूच आहे.

आजारी मातेचा झोळीतच मृत्यू झाल्याची घटना ताजी असता, बारीपाडा ते वेहगी असा सात किलोमीटर अंधाऱ्या रात्रीचा प्रवास गरोदर मातेला झोळीतून करावा लागला. प्रसूतीकळा सोसत झोळीत मातेला बॅटरीच्या उजेडात पायपीट करून आरोग्य केंद्रात पोहोचविले. तिने मुलाला जन्म दिल्यावर परतीचा प्रवासही झोळीतून झाला.

बांबूलन्स... सात किमी धावली... तशीच परतही आली - वेहगीच्या बारीपाडा येथे शनिवारी मध्यरात्री फुलांती देवराम पाडवी या गरोदर मातेला प्रसूती कळा सुरू झाल्या. बारीपाडा जवळून वाहणाऱ्या सुकी नदीवर पूल आणि सात किलोमीटरवरच्या वेहगी गावापर्यंत रस्ता नसल्याने नातेवाईकांनी बांबूची झोळी करून पायपीट सुरू केली. नदीच्या पाण्यातून बॅटरीच्या उजेडात वाट काढत बांबूच्या झोळीत मातेला वेहगी गावच्या मुख्य रस्त्यापर्यंत आणले गेले होते. वेहगी येथून खासगी वाहनाने मातेला पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यात आले. त्याठिकाणी मातेने सकाळी मुलाला जन्म दिला. दुपारी आरोग्य केंद्रातून सुट्टी मिळाली. मातेला वेहगी गावानंतर पुन्हा नातेवाईकांनी बांबूची झोळी करून बारीपाडा येथे परत आणले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.