🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मला फक्त देव कंट्रोल करतो..." आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यासाठी दिशा सालियनच्या वडिलांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी

"मला फक्त देव कंट्रोल करतो..." आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यासाठी दिशा सालियनच्या वडिलांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी


दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुंबईतील  ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याच्या गेटबाहेर शनिवारी दुपारी जोरदार हायव्होल्टेज ड्रामा  पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान  हे स्वतः वकिलांच्या टीमसह आमदार आदित्य ठाकरे  यांना कायदेशीर नोटीस  देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले.

आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यासंदर्भातील नोटीस देण्यासाठी सतीश सालियान हे मातोश्रीवर दाखल झाले होते.

'फक्त देव मला कंट्रोल करू शकतो' - सतीश सालियन

मातोश्रीवर पोहोचण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश सालियन अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसले. "मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. फक्त देव मला कंट्रोल करू शकतो, दुसरं कोणीही नाही," अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर मातोश्रीबाहेर पोहोचताच सतीश सालियन यांनी माझ्यासोबत वकिलांची पूर्ण टीम आहे. त्यांनी वेळ घेतला म्हणून सहा वर्षे गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यावर समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

मातोश्रीवर वकिलांची फौज; गेटवरच नोटीस स्वीकारण्याची तयारी
सतीश सालियान आणि त्यांच्या वकिलांची टीम आल्याची माहिती मिळताच मातोश्रीवरही हालचालींना वेग आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे देखील मातोश्रीवर दाखल झाले होते. तर अनिल परब यांनी आदित्य ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी वकील दिले असून, अॅडव्होकेट राहुल दिवटे आणि अॅडव्होकेट अनिल जाधव हे वकील नोटीस स्वीकारण्यासाठी थेट मातोश्रीच्या मुख्य गेटवर थांबल्याचे पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरेंना 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस

दरम्यान, यावेळी मातोश्री बाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी मातोश्रीचे गेट बंद केले होते. मातोश्री बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवसैनिक मातोश्री बाहेर आक्रमक झाल्याचे दिसून आले. सतीश सालियान यांना आत जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. यानंतर आदित्य ठाकरेंना बजावण्यात आलेली 500 कोटींची अब्रुनुकसानाची नोटीस ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली. नोटीस स्वीकारल्याची पावती सतीश सालियन यांच्या वकिलांना देण्यात आली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.