🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा बॅंकेच्या प्रगतीत गुलाबराव पाटील यांची स्वप्नपुर्ती अध्यक्ष मानसिंगराव नाईक; बॅंक, सहकार तपस्वी गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण

जिल्हा बॅंकेच्या प्रगतीत गुलाबराव पाटील यांची स्वप्नपुर्ती अध्यक्ष मानसिंगराव नाईक; बॅंक, सहकार तपस्वी गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण  


सांगली, ः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रगतीत सहकारमहर्षी गुलाबराव पाटील यांची स्वप्ने साकारली आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणे सहकारातून राजकारण बाजूला ठेवल्यामुळेच शतकमहोत्सवी वर्षात बॅंकेने सहकाराला वेगळी दिशा दिली, असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आज येथे केले. 

सांगली जिल्हा बॅंक व स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्यक्ष नाईक बोलत होते. यावेळी पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम व शिल्ड देवून गौरवण्यात आले. व्यासपीठावर उपाध्यक्षा जयश्री पाटील, आमदार सत्यजित देशमुख, अनिता सगरे, राहुल महाडीक, वैभव शिंदे, मन्सुर खतीब, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, सरकारी वकील ॲड प्रमोद भोकरे, विजय पाटील, बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते.  
अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले,‘ गुलाबराव पाटील यांच्या शिकवणीप्रमाणे सहकारातून राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या, सहकाराच्या प्रगतीसाठीचा ध्यास कायम ठेवला आहे. त्यांच्या आदर्शावर आजही बॅंक प्रगतीपथावर आहे. शतक महोत्सवी वर्षात त्यांचे वारसदार बॅंक संचालक पृथ्वीराज पाटील त्यांचा वारसा समर्थपणे चालविण्याचे काम करीत आहेत. मात्र बॅंकेसाठी आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेमुळे कार्यक्रम होणार की नाही असे वाटत होते. या कार्यक्रमांस कोणाचा विरोध नव्हता. बॅँकेच्या कारभारात पक्ष बाजुला ठेवून चांगल्या गोष्टीला पाठिंबा दिल्यानेच ठेवी, कर्जे, एनपीए कमी करण्यात यशस्वी झालो.’  
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले,‘ आम्ही जिल्हा बॅंकेत पाच वर्षात पक्षीय जोडे बाजुला ठेवून काम केले. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील यांच्या आदर्शावरच सहकाराची वाटचाल सुरु आहे. त्यांनी सामान्यांना उभारण्याचे काम आजही सुरु आहे.’  बॅंक संचालक व गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील म्हणाले,‘ गेली १३ वर्षे बॅंक व गुलाबराव पाटील ट्रस्टतर्फे आदर्श संस्थांना पुरस्कार देवून गौरवले जात आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील वेगळा प्रयोग आहे. गुलाबराव पाटील यांनी बॅंकेचे ३२ वर्षे नेतृत्व केले. मात्र त्यांच्या स्मृतीचा कार्यक्रम होवू नये, यासाठी काही लोकांना खोडा घातला. 

पुरस्कार विजेते असे-
पुरस्कार विजेत्यांनी रोख रक्कम, शिल्ड देवून गौरवण्यात आले. गट निहाय अनुक्रमे सत्कारमुर्ती असे- विकास सोसायटी प्रथम- शंकरराव शिंदे उत्तर भाग विकास सोसायटी आष्टाचे अध्यक्ष सर्जेराव तांबवेकर यांनी पुरस्कार स्विकारला. दुसरा- चिखली विकास सोसायटी चिखलीचे उपाध्यक्ष बाबुराव पाटील यांनी पुरस्कार स्विकारला. नागरी पतसंस्था गट- प्रथम - ऊर्जा सोसायटी, सांगलीचे सुभाष सावंत यांनी पुरस्कार स्विकारला. दुसरा- व्यंकटेश्‍वरा अर्बन सोसायटी ईश्‍वरपूरचे रघुनाथ बागडी यांनी पुरस्कार स्विकारला. तिसरा- सांगली जिल्हा वाहनचालक व ट्रान्सपोर्ट पतसंस्थेचे  अध्यक्ष राजशेखर सावळे यांनी पुरस्कार स्विकारला. विकास सोसायटी उकृष्ट सचिव म्हणून उत्तम पाटील तर आदर्श बॅंक कर्मचारी म्हणून दत्तात्रय भोकरे यांना पुरस्कार देण्यात आला. 
बॅंकेत तरुण येणार...

अध्यक्ष नाईक म्हणाले,‘ लवकरच बॅंक निवडणुकीची आचारसंहिता लागेल. दहा वर्षाच्या नियमामुळे जुन्या आठ संचालकांच्या ठिकाणी नव्या दमाचे तरुण संचालक बॅंकेत येतील.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.