🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध येणार? सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष!

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध येणार? सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष!

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने आगामी दिवाळी सणात देशभरात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे नागरिकांना पर्यावरणपूरक नियमांचे पालन करून सण साजरा करता येणार आहे.

पर्यावरणाचे रक्षण आणि पारंपरिक सण-उत्सव या दोघांचा योग्य समतोल साधणे आवश्यक असल्याचे पीठाने नमूद केले. त्यामुळे फटाक्यांवर सरसकट बंदी लादण्याऐवजी हिरव्या फटाक्यांचा वापर आणि वेळेचे नियोजन यावर भर देण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी घालणे व्यवहार्य नसल्याने न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. तसेच कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाक्यांच्या निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन दिले जात आह.सणाच्या काळात फटाके फोडण्यासाठी विशिष्ट वेळा निश्चित करण्यात याव्यात, जेणेकरून ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात राहील असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रदुषण रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नियमांचे आणि वेळेच्या मर्यादांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश न्यायाल्याकडून देण्यात आले आहेत.दिवाळी हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. या काळात बाजारपेठेत हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, मोठ्या आवाजाच्या आणि जास्त धूर सोडणाऱ्या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर दरवर्षी चिंता व्यक्त केली जाते.

या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वसमावेशक मार्ग काढत नागरिकांना नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.