SBI मध्ये तुमचं खातं असेल आणि तुम्ही वारंवार ATM मधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून SBI च्या काही खात्यांसाठी ATM व्यवहारांचा नियमांमध्ये बदल होणार आहेत.
विशेषत: सॅलरी पॅकेज अकाऊंट आणि बेसिक सेविंग बँक डिपॉझिट म्हणजेच BSBD ACCOUNT असलेल्या ग्राहाकंवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो.
सॅलरी अकाउंट असणाऱ्यांसाठी मोठी बदल
SBI च्या सॅलरी पॅकेज अकाउंट असलेल्या ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या ATM किंवा ADWN मधून पैसे काढताना आतापर्यंत महिन्याला 10 मोफत व्यवहारांची सुविधा होती. पण 1 ऑक्टोबरपासून ही मर्यादा ५ व्यवहारांवर येणार आहे. ही मर्यादा SBI च्या सर्व प्रकारच्या सॅलरी पॅक अकाउंटला लागू असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या ५ व्यवहारांमध्ये फक्त पैसे काढणेच नाही तर Balance cheque आणि mini statement सारखे non- ficitional व्यवहारही मोजले जाणार आहेत. म्हणजेच महिन्यात दुसऱ्या बँकेच्या ATM वर केलेल्या अशा व्यवहारांची संख्या ठेवावी लागणार आहे.
५ व्यवहार संपल्यानंतर किती पैसे मोजावे लागतील
महिन्याची 2 मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यावर दुसऱ्या बँकच्या ATM मधून CASH WITHDRAWAL केल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 23 रूपये आणि त्यावर GST द्यावा लागेल. BALANCE cheque किंवा mini statement सारख्या non- ficitional व्यवहारांसाठी 11 रूपये आणि GST आकारला जाईल.
BSBD ACCOUNT ग्राहकांसाठीही बदल
SBI च्या बेसिक सेविंग बँक डिपॉझिट म्हणजेच BSBD ACCOUNT साठीही 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. या खात्यात महिन्याला 4 CASH WITHDRAWAS मोफत असतील. त्यानंतर केलेल्या प्रत्येक CASH WITHDRAWAL साठी 15 रूपये आणि त्यावर GST आकारला जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.