🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'त्या' तरूणीच्या मागे काळ लागलाय? ४५ दिवसांत एकाच सापाने ७ वेळा डसले; BSC च्या विद्यार्थिनीचा जीव टांगणीला!

​'त्या' तरूणीच्या मागे काळ लागलाय? ४५ दिवसांत एकाच सापाने ७ वेळा डसले; BSC च्या विद्यार्थिनीचा जीव टांगणीला!

हाथरस - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका घरात लपलेल्या सापाने बीएससीमध्ये शिकणाऱ्या तरूणीला ३ दिवसांत तिनदा दंश दिला. गेल्या दीड महिन्यात या तरूणीला ७ वेळा सापाने चावा घेतल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब दहशतीत आहे. या मुलीला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

शनिवारी सकाळी बाथरूममध्ये अंघोळ करताना या तरूणीला शेवटचे सापाने चावले होते. तरुणीचा आवाज ऐकून तिचे आई वडील धावत गेले. त्यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने औषधोपचार केले आणि आता तिच्या प्रकृतीत सुधार होत आहे.

२ दिवसांपूर्वी साप चावला

हाथरसच्या एंहन गावात राहणारी अनिता एका कॉलेजमध्ये बीएससीचे शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी सापाने अनिताला दंश दिला होता त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथून अलीगडच्या रुग्णालयात तिला उपचारासाठी नेण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता असं वडिलांनी म्हटलं.

सर्पमित्रांनाही साप घावेना

शनिवारी अनिताला पुन्हा सापाने दंश केला, त्यानंतर तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या दीड महिन्यात माझ्या मुलीला त्याच सापाने सात वेळा दंश केला आहे असं अनिताच्या वडिलांनी म्हटलं. साप पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलावण्यात आले आहे पण तो काही सापडत नाहीये.

दरम्यान, किशोरवयीन मुलीला आपत्कालीन कक्षात तात्काळ विषप्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. दोन तासांत तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तो साप फार विषारी नसावा असा संशय आहे. त्यामुळेच त्या किशोरवयीन मुलीचा जीव वारंवार वाचला असून तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे असं हाथरस जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सूर्यप्रकाश यांनी म्हटलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.