बॅकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. एसबीआयने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत तीन महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
या पदांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नसून, निवड केवळ अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक कमाल ९८ लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅकेज मिळणार आहे. ही भरती कोलकात्यामधील 'स्टेट बँक इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप' साठी कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे.
रिक्त पदांचा तपशील आणि मिळणारे मानधन (CTC) या भरती मोहिमेद्वारे एकूण ३ जागा भरल्या जाणार आहेत:
डीन – १ जागा : कमाल वार्षिक पॅकेज ९८ लाख रुपये.
फॅकल्टी – १ जागा : कमाल वार्षिक पॅकेज ६३ लाख रुपये.
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह – १ जागा : कमाल वार्षिक पॅकेज ५२ लाख रुपये.
शैक्षणिक पात्रता व अनुभव डीन : उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ४० ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराकडे किमान ५५% गुणांसह MBA, Executive MBA, PGDM, PGDBA किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. (PhD/MPhil धारकांना प्राधान्य). यासोबतच किमान १५ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक असून, त्यापैकी ३ वर्षे वरिष्ठ शैक्षणिक किंवा नेतृत्व पदाचा अनुभव असावा.
फॅकल्टी : कोणत्याही विषयात किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर (Post Graduate) पदवी आवश्यक. संबंधित विषयात किमान ६ वर्षे अध्यापन किंवा प्रशिक्षणाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह : मार्केटिंगमधील MBA किंवा समकक्ष पदवी (किमान ५५% गुण) आवश्यक. तसेच मार्केटिंग क्षेत्रात किमान ५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे.निवड प्रक्रिया कशी असेल? या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. प्राप्त अर्जांमधून शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांची प्राथमिक निवड (Shortlisting) केली जाईल. त्यानंतर डीन आणि फैकल्टी पदांसाठी मुलाखत व 'डेमो सेशन' घेतले जाईल, तर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी थेट मुलाखत घेतली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराचे पॅकेज त्याच्या अनुभवावर आधारित निश्चित केले जाईल.
अर्ज कसा आणि कधीपर्यंत करावा? या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, पात्र व इच्छुक उमेदवार ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.