🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"जीव जातोय का ४० पैशांनी?" निती आयोगाच्या उपाध्यक्षांचा सवाल; UPI शुल्कावरून व्यापाऱ्यांत संताप, चाणक्य नीतीचा दाखला देत करवसुलीचे समर्थन!

"जीव जातोय का ४० पैशांनी?" निती आयोगाच्या उपाध्यक्षांचा सवाल; UPI शुल्कावरून व्यापाऱ्यांत संताप, चाणक्य नीतीचा दाखला देत करवसुलीचे समर्थन!


केंद्र सरकारकडून आता मोठ्या युपीआय व्यवहारांवर शुल्क लावणार आहे. यावरून देशात व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जातेय. काही तज्ज्ञांनी यावर चांगला निर्णय असल्याचं म्हटलंय. तर काहींनी सर्वसामान्य लोकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केलीय. दरम्यान, निती आयोगाचे उपाध्यक्ष यांनी वादग्रस्त विधान केलंय. नीति आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलंय. त्यांनी म्हटलं की, सरकार कर न घेता चालवता येत नाही. सरकार किरकोळ शुल्क वसूल करत आहे आणि ते देण्यात लोकांना काहीच अडचण असू नये.


अशोक लाहिरी म्हणाले की, शुल्क आकारण्याबाबतचं मत माझं व्यक्तिगत मत आहे, नीति आयोगाचं अधिकृत म्हणणं नाही. नव्या निर्णयाबाबत ते म्हणाले की, सरकार प्रत्येक व्यवहारावर अमर्याद कालावधीसाठी सूट देऊ शकत नाही. मला वाटतं की, लोकांनी प्रत्येक कामासाठी कर दिलाच पाहिजे. चाणक्य नीतिचं उदाहरण देत अशोक लाहिरी यांनी सांगितलं की, मधमाशी जसं फुलाला कोणतीही इजा न करता हळू हळू मध गोळा करते तसं एका राजाने प्रजेकडून कर वसूल केला पाहिजे.

लाहिरी यांनी व्यवहारांवर लागणाऱ्या शुल्काची तुलना चेकबूकसारख्या इतर बँकिंग सेवांशी केलीय. ते म्हणाले की, १०० रुपयांच्या व्यवहारांवर फक्त ४० पैसे द्यावे लागतील. तेही फक्त मोठ्या व्यवहारांवर. त्यामुळे तुमचा जीव जाणार आहे का? नक्कीच नाही. व्यवस्था चालवण्यासाठी खर्च द्यावा लागेल आणि हळू हळू याची सवय होईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.