🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फ्री Wi-Fi च्या मोहामुळे सापडू शकता अडचणीत! कनेक्ट करण्यापूर्वी जाणून घ्या धोके

फ्री Wi-Fi च्या मोहामुळे सापडू शकता अडचणीत! कनेक्ट करण्यापूर्वी जाणून घ्या धोके


मुंबई : आजच्या काळात इंटरनेट ही आपली गरज बनलंय. स्मार्टफोनमधील कोणतंही काम करायचं म्हटलं तर आधी इंटरनेट असावं लागतं. याच कारणामुळे मेट्रो स्टेशन, एयरपोर्ट, हॉटेल, कॅफे आणि शॉपिंग मॉलसारख्या ठिकाणी आता फ्री वाय-फाय मिळणं हे सामान्य झालंय.


अनेक लोक आपला मोबाईल डेटा वाचवण्यासाठी लगेच आपला फोन वाय-फायला कनेक्ट करतात. पण कोणत्याही अनोळखी नेटवर्कला कनेक्ट केल्याने तुमची ऑनलाइन सेफ्टी धोक्यात येऊ शकते. यामुळे फ्री वाय-फाय वापरताना काही लहान-लहान गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

सर्वात मोठा धोका हा Fake Wi-Fi Network चा असतो

पब्लिक वायफाय वापरताना सर्वात आधी पेस नेटवर्कपासून सावधान राहिलं पाहिजे. सायबर गुन्हेगार कोणत्याही मेट्रो स्टेशन, कॅफे किंवा दुसऱ्या लोप्रिय जागांच्या खऱ्या Wi-Fi नावासारखं नाव तयार करुन आपला हॉटस्पॉट चालवू शकतात. समजा एखाद्या कॅफेचं Wi-Fi चं नाव वेगळंच आहे. पण स्कॅमरने मिळतं-जुळतं नाव ठेवलं असेल. अशावेळी यूझर कंफ्यूज होतो आणि चुकीच्या नेटवर्कला कनेक्ट करतो. यामुळे कोणत्याही पब्लिक जागांवर वाय-फाय वापर करण्यापूर्वी तेथील स्टाफकडून नेटवर्कचं योग्य नाव आणि कनेक्ट करण्याची पद्धत विचारुन घेणं बेस्ट ठरतं.

फक्त HTTPS पाहून निश्चिंत होऊ नका

अनेक लोकांना वाटतं की, जर फोन Wi-Fi शी कनेक्ट आहे तर सर्व माहिती सहजपणे चोरली जाऊ शकते. मात्र, सत्य तेच असेल असं नाही. आजकाल बहुतेक वेबसाइट्स 'HTTPS' एन्क्रिप्शनचा वापर करतात, ज्यामुळे तुमचे डिव्हाइस आणि वेबसाइट यांच्यात देवाणघेवाण होणारी माहिती सुरक्षित राहण्यास मदत होते.

मात्र, Wi-Fi नेटवर्कची सेफ्टी आणि वेबसाइटची सुरक्षा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे, फक्त एखाद्या वेबसाइटवर HTTPS दिसले म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहू नये. एखाद्या संशयास्पद पेजने अचानक तुमचा पासवर्ड, बँकेचे डिटेल्स किंवा कार्डची माहिती मागितली, तर सावध राहा.

Public Wi-Fi वर बँकिंग करणं टाळा

फ्री वाय-फायचा वापर करत असताना बँकिंग किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित महत्त्वाची कामं करू नका. अशा प्रकारे संवेदनशील अकाउंटमध्ये लॉगिन करणंही टाळा. जर एखाद्या पॉप-अप किंवा वेबसाइटवर अचानक तुम्हाला पासवर्ड, बँक डिटेल्स, कार्ड नंबर किंवा दुसरी खासगी माहिती मागितली. तर वायफाय लगेच बंद करा. लक्षात ठेवा, HTTPS दिसणे म्हणजे प्रत्येक पेज विश्वासार्ह असतंच असं नाही.

फोनचं Auto-Connect बंद करा

तुमच्या फोनमध्ये वाय-फायचं ऑटो कनेक्ट फीचर चालू असेल. तर तो लगेच बंद करा. यामुळे फोन आसपास उपलब्ध कोणत्याही नेटवर्कशी आपोआप जोडलं जाणार नाही.गरज पडल्यावर मोबाईल डेटा वापर करणे किंवा आपल्या फोनचा पर्सनल हॉटस्पॉट चालवणं जास्त सुरक्षित ऑप्शन ठरू शकतो. विशेषतः बँकिंग किंवा गरजेच्या अकाउंटमध्ये लॉगिन करताना आपल्या विश्वासार्ह इंटरनेट कनेक्शनचा वापर करणं बेस्ट ठरतं.

फोन आणि ॲप्स नेहमी अपडेट ठेवा

ऑनलाइन सेफ्टी ही केवळ वाय-फायपुरती मर्यादित नाही. तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आणि सर्व महत्त्वाची ॲप्स अपडेट ठेवा. कारण अपडेट्समध्ये सुरक्षेशी संबंधित सुधारणांचा समावेश केला जातो. यासह, प्रत्येक अकाउंटसाठी मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरा. ​​जिथे उपलब्ध असेल तिथे 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' सुरू करा. यामुळे तुमच्या अकाउंटची सुरक्षा फक्त पासवर्डवर अवलंबून राहत नाही.

काम पूर्ण झाल्यावर Wi-Fi डिस्कनेक्ट करा

तुम्ही एखाद्या कॅफे, हॉटेल किंवा एयरपोर्टवर पब्लिक Wi-Fi चा वापर केला. तर संपल्यावर लगेच डिस्कनेक्ट करा. तसेच, ज्या नेटवर्कची तुम्हाला आता गरज नाही, ती तुमच्या फोनवरील 'सेव्ह केलेल्या नेटवर्क'च्या लिस्टमधून काढून टाका. यामुळे भविष्यात तुमचा फोन त्या नेटवर्कशी आपोआप पुन्हा कनेक्ट होणार नाही.

फ्री Wi-Fi वापरा, पण समजदारी बाळगून

पब्लिक वायफाय हा दरवेळी धोकाच नाही. समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा आपण एखाद्या नेटवर्कची ओळख व्हेरिफाय न पाहता त्याला कनेक्ट होतो. तसंच त्या कनेक्शनवर संवेदनशील काम करतो. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मेट्रो स्टेशन, विमानतळ किंवा कॅफेमध्ये फ्री वाय-फाय दिसलं. तेव्हा त्याशी कनेक्ट होण्यापूर्वी नेटवर्कचं नाव चेक करा. शक्य असेल तर मोबाईल डेटा किंवा स्वतःचा हॉटस्पॉट वापरा आणि काम झाल्यावर वाय-फायवरून डिस्कनेक्ट करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.