🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अभिनेता आमिर खानच्या भाच्याला मोठा झटका! आंदोलनात सहभागी होणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस

अभिनेता आमिर खानच्या भाच्याला मोठा झटका! आंदोलनात सहभागी होणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस


प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी एक मोठी नोटीस बजावली आहे. इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या एका निदर्शनात (आंदोलनात) इम्रान खान सहभागी झाला होता.

नेमके प्रकरण काय?
ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी इम्रान खानसह अनेकांना ताब्यात घेतले होते. इम्रान खान हा भारतीय नागरिक नसल्याचे समोर आले असून, तो परदेशी नागरिक किंवा ओसीआय कार्डधारक आहे. 

भारतीय नागरिक नसतानाही अशा आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे, इम्रान खानविरोधात इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार मुंबई पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे चित्रपट आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.