🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारनामा: ११ लाखांची गोवामेड दारू जप्त, पण तस्करांना 'अभय'? आरोपींना फक्त नोटीस देऊन सोडल्याने 'अंदर की बात' काय?

मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारनामा: ११ लाखांची गोवामेड दारू जप्त, पण तस्करांना 'अभय'? आरोपींना फक्त नोटीस देऊन सोडल्याने 'अंदर की बात' काय?


२ ऑक्टोबर या राष्ट्रीय ड्राय डेच्या दिवशी मिरज तालुक्यातील तानंग हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ लाख रुपयांची गोवामेड दारू पकडून मोठी कारवाई केल्याचा आव आणला. मात्र, या कारवाईनंतर पोलीस कोठडीची  मागणी न करता, पकडलेल्या आरोपींना अवघ्या एका नोटीसवर सोडण्यात आल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​एवढ्या मोठ्या प्रमाणातील अवैध दारू तस्करीप्रकरणात आरोपींची पोलीस कोठडी का घेतली नाही? त्यांना तात्काळ मोकळे रान का दिले गेले? मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाने खरोखरच 'टाळूवरचं लोणी' खाऊन हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला आहे का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

​संशयास्पद कारभारावर उपस्थित होणारे ५ गंभीर प्रश्न:

​आरोपींना नोटीस देऊन सोडण्याचे गुपित काय?

११ लाखांचा माल आणि २ आरोपी रंगेहात पकडल्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी (PC) मागणे कायदेशीरदृष्ट्या गरजेचे होते. मात्र, आरोपींना थेट नोटीस देऊन सोडून दिल्यामुळे यामागे मोठा 'मलिदा' खाल्ला गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. 

साधी प्रेसनोट का प्रसिद्ध केली नाही?
एरवी किरकोळ कारवायांचे कौतुक मिरवणारे अधिकारी एवढ्या मोठ्या आंतरराज्यीय तस्करीच्या कारवाईनंतर शांत का बसले? ऐनकेन प्रकारे हा विषय दाबण्यासाठीच मीडियाला  या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले का?
​वर्धा दारूबंदी जिल्ह्यात जाणारा माल मिरजेत कसा?

गोव्याहून निघालेली ही दारू दोन राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात पूर्ण दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याकडे चालली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मेहेरबानीशिवाय आणि हप्तेबाजीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासकीय महसूल बुडवून आंतरराज्यीय तस्करी होणे शक्य आहे का?

​खाबुगिरीत मिरज कार्यालय 'नंबर वन'?
कारवायांपेक्षा वसुली आणि 'खाबुगिरी'मध्येच मिरज राज्य उत्पादन शुल्क विभाग नंबर वन असल्याची टीका आता नागरिक करत आहेत. अधिकाऱ्यांचे तस्करांशी साटेलोटे असल्याशिवाय एवढ्या हिमतीने दारूची वाहतूक होऊच शकत नाही.
​तपास खोलवर जाणार की प्रकरण बासनात गुंडाळणार?

या संपूर्ण गैरप्रकाराची सखोल चौकशी होणार का, की नेहमीप्रमाणे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर खापर फोडून मुख्य सूत्रधार आणि सामील अधिकाऱ्यांना वाचवले जाणार?

​वरिष्ठ या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!
​शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या आणि ड्राय डेच्या दिवशीच अवैध दारूची तस्करी करणाऱ्या या रॅकेटला अभय देणाऱ्या मिरज कार्यालयातील संशयित अधिकाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि सांगली उत्पादन शुल्क अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
क्रमश.......

​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.