🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम; सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ – चेअरमन भारती चोपडे​संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका: संचालक मंडळाचे सभासद व ठेवीदारांना आवाहन​

कर्मवीर पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम; सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ – चेअरमन भारती चोपडे ​संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका: संचालक मंडळाचे सभासद व ठेवीदारांना आवाहन


​सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून सभासद आणि ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे, अशी ग्वाही संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिली. संस्थेच्या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीबद्दल त्यांनी सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

​संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती देताना चेअरमन श्रीमती भारती चोपडे म्हणाल्या की, सभासदांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळेच ठेवींचा ओघ सातत्याने सुरू आहे. संस्थेच्या ठेवी, भागभांडवल आणि स्वनिधीमध्ये समाधानकारक वाढ झाली असून गुंतवणूक अत्यंत सुरक्षित आणि भक्कम आहे. कर्जाचे वितरण योग्य कागदपत्रांची पूर्तता करूनच केले जात आहे. तसेच वसुलीचे कामही अत्यंत समाधानकारक सुरू असून येत्या काळात याचे अधिक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

​चुकीच्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नका
सध्या सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्थेकडून आकर्षक ठेव योजना आणि विविध कर्ज योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच, "संस्थेबाबत पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही चुकीच्या बातमीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी कोणतीही बातमी संस्थेकडून दिली जात नाही," असे स्पष्ट करत चेअरमन चोपडे यांनी सभासदांना आश्वस्त केले. 
​कर्जदारांना हप्ते नियमित भरण्याचे आवाहन

एनपीएच्या नवीन नियमांनुसार सर्व कर्जदारांनी आपले मासिक हप्ते वेळेवर भरून कर्जाची खाते नियमित ठेवावीत, जेणेकरून भविष्यातील अडचणी टळतील आणि संस्थेच्या प्रगतीला गती मिळेल, अशी विनंतीही त्यांनी केली.

​एकजूट आणि पारदर्शक कारभार
चालू आर्थिक वर्षासाठी चेअरमन म्हणून श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे आणि व्हाईस चेअरमन म्हणून ॲड. एस. पी. मगदूम हे कामकाज पाहत आहेत. सर्व संचालक मंडळ, सेवक, ठेवीदार, हितचिंतक आणि ऑडिटर्सच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून एकत्रितपणे निर्णय घेतले जात आहेत. येत्या मार्च अखेर पतसंस्थेला अधिक उत्तम आणि उत्कृष्ट निकाल मिळतील, असा विश्वास व्यक्त करत चेअरमन भारती चोपडे यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.