सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपा सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री.प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद
सांगली :- भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत भाजपा सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री.प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या निमित्ताने संघटनात्मक एकजूट, सेवा कार्याची बांधिलकी आणि विकसित भारताच्या संकल्पाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदीजी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित जनतेशी संवाद साधत मार्गदर्शन केले. देशाच्या विकासाचा प्रवास, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीची भावना यांना केंद्रस्थानी ठेवून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला सांगलीतही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर सांगली येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच भारतमाता, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. राष्ट्रसेवा, संघटन आणि समाजाच्या सर्व घटकांपर्यंत विकासाची भूमिका पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
सांगलीच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारे श्री. मोहन चोरमुले आणि श्री. प्रकाश कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा जपत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रकोष्ठ संयोजक श्री. मकरंद देशपांडे आणि राज्य परिषद सदस्य श्री. प्रकाश बिरजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेवा, संघटन आणि राष्ट्रनिर्मितीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची भूमिका त्यांनी मांडली.७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सार्वजनिक जीवनातील महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापासून ते २०१४ पासून भारताचे पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करण्यापर्यंतचा २५ वर्षांचा सार्वजनिक सेवेचा प्रवास या अभियानाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला.‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या संकल्पनेच्या माध्यमातून विकासाचा व्यापक दृष्टिकोन पुढे नेत २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडविण्याचे ध्येय देशासमोर ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने देशभरातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘सेवा ज्योती यात्रा’सह विविध उपक्रम राबविण्यात आले.‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून सेवा, सुशासन, संघटन आणि राष्ट्रनिर्मितीचा संकल्प अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी सेवा उपक्रम राबविणे आणि विकसित भारताच्या संकल्पनेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग वाढविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.सांगली-मिरजमधील या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही सेवा हीच संघटनेची शक्ती आणि राष्ट्रनिर्मिती हीच कार्यकर्त्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.‘सेवा ज्योती यात्रा’च्या निमित्ताने सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपा संघटनेची व्यापक उपस्थिती पाहायला मिळाली. जिल्हा, प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांसह विविध लोकप्रतिनिधी, मंडल पदाधिकारी आणि बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रकोष्ठ संयोजक श्री. मकरंद देशपांडे, राज्य परिषद सदस्य श्री. प्रकाश बिरजे, माजी आमदार श्री. दिनकर पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीताताई केळकर, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री. पृथ्वीराज पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीताई दिगडे, भाजपा नेत्या जयश्रीताई पाटील, भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील आणि भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश ढंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, विविध लोकप्रतिनिधी, मोर्चा व प्रकोष्ठांचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सांगली-मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आणि संघटनेतील विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यामुळे ‘सेवा ज्योती यात्रा’ हा सेवा, संघटन आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.