🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

राज्यभरात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. राज्यात पाच मतदारसंघात निवडणुका पार पडणार असून यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर मतदारसंघ या मतदारसंघांचा समावेश आहे.

निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच भाजपने तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मिळून पाच मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जय्यत तयारी केली जात आहे. या पाचही जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या काही उमेदवारांनी बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात इच्छुक होते, परंतु तिकीट मिळालं नाही, अशा काही नेत्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान, या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतरही काही जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज कायम ठेवले. ज्यामुळे जिथे-जिथे बंडखोरी झाली तिथे भाजपकडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली. भाजपने बंडखोरी करणाऱ्या तीन उमेदवारांना थेट पक्षातून निष्कासित केले आहे. भाजपच्या या कारवाईमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे आहे, यामुळे या मतदारसंघातून शिंदेसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवार देण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी बंडखोरी केली. त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाई करत या तीनही नेत्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित केले आहे.

तथापि, चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार या बंडखोर नेत्यांना पक्षातून निष्कासीत करण्यात आलं आहे. असे असले तरीही ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील. यामुळे या अमरावती शिक्षक चीमतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांचं टेन्शन कायम असल्याचे दिसून येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.