🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"८८ मतदारांचा 'खरा गेम'! सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकर अडकले स्वकीयांच्याच जाळ्यात?"

​"८८ मतदारांचा 'खरा गेम'! सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकर अडकले स्वकीयांच्याच जाळ्यात?"


सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी जत सोसायटी गटातील लढतीने राजकीय वातावरण तापवले आहे. भाजपचेच जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी पडळकरांपासून फारकत घेत बंधू विनोद पवार यांना पडळकरांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.



यामुळे जिल्हा बँकेच्या लढाईला अधिक धार आली.

जिल्ह्यातील नेते बँकेत आपली सोयरिक जपत, पडळकर यांचा बँकेतील सरळ प्रवास खडतर कसा होईल, त्यांना विजयापासून कसे दूर ठेवता येईल, यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. विरोधकांच्या या षड्यंत्राला छेद देऊन पडळकर बँकेत कसे पोहोचणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर जत सोसायटी गटातील ८८ मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे लक्ष लागले आहे.  जिल्हा बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पडळकर यांनी यापूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती. 




त्यांनी स्वतः निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. कोल्हापूर खंडपीठाने अर्ज अवैध ठरवल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांना दिलासा मिळाला. या घडामोडींमुळे बँकेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. त्यातून १५ जागा बिनविरोध झाल्या; मात्र जत सोसायटी गटात निवडणूक अटळ ठरली. विशेष म्हणजे, दुष्काळाची तीव्रता असलेल्या जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत निवडणूक होत असल्याने बिनविरोध निवडींच्या राजकारणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

भाजपमधील अंतर्गत समीकरणांची कसोटी

स्थानिक नेतृत्वाचे वर्चस्व, सहकारातील प्रभाव आणि बदलती राजकीय निष्ठा यांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश जमदाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनीही पडळकरांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय, निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले घाऊक पक्षप्रवेश आणि स्थानिक पातळीवरील बदलत्या भूमिका यांमुळे राजकीय समीकरणांची नव्याने मांडणी सुरू आहे.






➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.