🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छ. संभाजीनगरात गुंडांचा हैदोस! थेट 'मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यां'च्या कारवर हातोड्याने हल्ला; चालकाचे तोंड फोडले

छ. संभाजीनगरात गुंडांचा हैदोस! थेट 'मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यां'च्या कारवर हातोड्याने हल्ला; चालकाचे तोंड फोडले


छत्रपती संभाजीनगर : न्यायालयीन कामकाज आटोपून परतणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला अडवून एका मोपेडस्वारासह त्याच्या टवाळखोर साथीदाराने गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 
विट्स हॉटेल चौकात घडलेल्या या घटनेत आरोपींनी कारचालकाच्या तोंडावर कड्याने प्रहार करून गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या साथीदाराने हातोड्याने कारची तोडफोड केली. वाहनावर 'मुख्य न्यायदंडाधिकारी' अशी पाटी असल्याचे लक्षात येताच संशयित पसार झाले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू होता.

जिल्हा न्यायालयातील चालक शेख इकबाल शेख इब्राहिम हे मंगळवारी नेहमीप्रमाणे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या शासकीय गाडीवर कर्तव्यावर होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी, वरिष्ठ लिपिक, शिपाई यांच्यासह पैठण येथे कामकाजासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात परतल्यानंतर विट्स हॉटेल चौकात सुसाट मोपेडस्वार अचानक त्यांच्या कारसमोर आडवा आला. कारचालकाने त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, टवाळखोराने खाली उतरून चालकाला शिवीगाळ करत कारची काच वाजवली. चालकाने काच खाली करताच संशयिताने हातातील कड्याने थेट त्यांच्यावर वार केला. चालक शेख इकबाल यांच्या तोंडातून रक्त वाहू लागले.

दुचाकीला हातोडा टांगून मुक्तसंचार... संशयित दुचाकीला हातोडा लावून फिरत होते. हँडलवर ठेवलेला हातोडा काढून त्यांनी कारचालकाच्या बाजूच्या दरवाजावर मारून कारची तोडफोड केली. मात्र, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा कारवरील फलक पाहताच त्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिसांनी धाव घेतली. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्हा न्यायालयात पोहोचवले. इकबाल यांना वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आले. इकबाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

अयोध्यानगरीकडे पोबारा संशयित भाजीवाली बाई पुतळ्याकडून आले होते. घटनेनंतर गाडे चौकातून अयोध्या नगरीच्या दिशेने पळाले. फुटेजमध्ये संशयित कैद झाले. मात्र, अस्पष्ट फुटेजमुळे त्यांचे चेहरे, दुचाकी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडचणी येत आहे.. संशयित नशेत असावेत असा संशय पोलिसांना आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.