🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्दायक! स्वर्गाचं खोटं आमिष दाखवून १९० निष्पाप बालकांसह ४०० हून अधिक जणांना उपाशी मारलं; नराधम पादऱ्याला अखेर अटक!

धक्दायक! स्वर्गाचं खोटं आमिष दाखवून १९० निष्पाप बालकांसह ४०० हून अधिक जणांना उपाशी मारलं; नराधम पादऱ्याला अखेर अटक!

स्वर्गात जाण्याचे आमिष दाखवून 190 लहान मुलं आणि एका प्रौढ व्यक्तीला उपाशी मारणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरूसह त्याच्या 30 साथिदारांना केनियातील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पॉल मॅकेन्झी असे या धर्मगुरुचे नाव आहे.

तो 'गुड न्यूज इंटरनॅशनल चर्च' या धार्मिक संस्थेचा प्रमुख असून 6 नोव्हेंबर रोजी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.

जगाचा अंत होण्यापूर्वी उपाशी राहून देहत्याग केल्यास स्वर्गात पोहोचाल, असे म्हणत धर्मगुरू मॅकेन्झी यांनी अनुयायांना उपाशी ठेवले. या प्रकरणी न्यायमूर्ती डायना कावेड्झा यांनी सोमवारी निकाल दिला. धार्मिक शिकवणीचा वापर करून अनुयायांना मृत्यू होईपर्यंत उपाशी ठेवल्याप्रकरणी धर्मगुरू मॅकेन्झी यांना दोषी ठरवण्यात आले.

वैद्यकीत उपचार हे सैतानाचे साधक असल्याचे सांगत आजारी व्यक्तींना उपचारांपासून दूर ठेवण्यात आले आणि त्यांना मरेपर्यंत उपाशी ठेवण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने धर्मगुरू मॅकेन्झी यांना दोषी ठरवले आहे. मात्र मॅकेन्झीने हे आरोप फेटाळून लावले असून आपण कुणालाही उपाशी राहण्यास भाग पाडले नसल्याचे म्हटले.

दरम्यान, या निकालामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे मॅकेन्झी आणि या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या अन्य आरोपींच्या शिक्षेबाबत 30 ऑक्टोबर रोजी युक्तिवादासाठी सुनावणी होणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात मॅकेन्झीसह अन्य आरोपींविरोधातही खटला चालवण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

2023 मध्ये केनियाच्या किनारी भागातील किलिफी काउंटीमध्ये असलेल्या चाकामा रॅन्च परिसरातील शाकाहोला जंगलात सामूहिक कबरींमध्ये 400 हून अधिक मृतदेह आढळले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. मॅकेन्झीचे अनुयायी सुमारे 800 एकर क्षेत्रफळाच्या या परिसरात झोपड्यांमध्ये राहत होते. जवळच्या वस्तीपासून आणि सरकारी यंत्रणांपासून दूर राहून तेथे धार्मिक शिकवणीचे पालन केले जात होते. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर मॅकेन्झीला अटक करण्यात आली. त्याची पत्नी आणि अनेक अनुयायांवरही कारवाई करण्यात आली. काही अनुयायी नंतर सरकारी पक्षाचे साक्षीदार बनले. 2023 मध्ये या प्रकरणाच्या खटल्याला सुरुवात झाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.