🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजब तरीका! थेट तिरडीवर झोपून भरला पदवीधरचा अर्ज; धडाकेबाज प्रतीकात्मक अंत्ययात्रेने प्रशासन हादरले!

अजब तरीका! थेट तिरडीवर झोपून भरला पदवीधरचा अर्ज; धडाकेबाज प्रतीकात्मक अंत्ययात्रेने प्रशासन हादरले!


छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय चुरस आता पराकोटीला पोहोचली असून, प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांनी अनोख्या आंदोलनांच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधींना थेट फोन लावून जाब विचारण्यासाठी राज्यभरात ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी चक्क तिरडीवर झोपून, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कूच केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. "हे सगळे नेते मेलेले आहेत, त्यांना जागे करायचे आहे," अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी व्यवस्थेच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.
चांदणी चौकातून विभागीय आयुक्तालयाकडे कूच; पोलिसांची धावपळ ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रमेश पाटील यांनी चांदणी चौकातून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे एखाद्या खऱ्या अंत्ययात्रेप्रमाणे वाजत-गाजत तिरडीवरून निघण्याचा प्रयत्न केला. तिरडीवर झोपून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या पाटील यांच्या या आंदोलनाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी रमेश पाटील यांना तिरडीवरून खाली उतरवले, त्यांच्या गळ्यातील हार काढून घेतला आणि तिरडी जप्त केली. त्यानंतरच त्यांना रीतसर पायी जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. 
"स्टंटबाजी नाही, पदवीधरांच्या उपेक्षेविरुद्धची उद्विग्नता!" तिरडीवरून अर्ज भरण्याच्या प्रकारावर सोशल मीडियावर काही जणांनी स्टंटबाजी म्हणून टीका केली असता, रमेश पाटील यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. "हा कोणताही स्टंट नसून पदवीधरांची झालेली दुर्दशा पाहून आलेली उद्विग्नता आहे. गेल्या १८ वर्षांत पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराने विद्यार्थी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी साधे तोंडही उघडले नाही. महाराष्ट्रात पेपरफुटीच्या गैरप्रकारांमुळे शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी आत्महत्या केल्या; मात्र पदवीधरांचे आमदार मूग गिळून गप्प बसले. सामान्य जनतेवर ही जिवंतपणी मरायची वेळ आणली आहे, म्हणून मी हा प्रतिकात्मक अंत्ययात्रेचा मार्ग निवडला," असा घणाघात त्यांनी केला.
'मी कामाचा माणूस वाटत असेल तरच साथ द्या' मतदारांना भावनिक साकडे: रमेश पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले आहे की, पदवी हे केवळ कागदाचे प्रमाणपत्र नसून ती समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. पदवीधर मतदारसंघाची ही लढाई म्हणजे सुशिक्षित समाजाच्या विचारांची आणि अपेक्षांची परखड परीक्षा आहे. "मी आजपर्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. जर मतदारांना वाटत असेल की मी खरोखरच 'कामाचा माणूस' आहे, तरच त्यांनी मला पदवीधर म्हणून पाठिंबा द्यावा. माझी ही उमेदवारी शेवटपर्यंत कायम राहील," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.