🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सॉरी श्रेयांस, मम्मी, पप्पा अन् प्राची! घरात चिठ्ठी; एक्स्प्रेस वेवर कारमध्ये डॉक्टरची बॉडी

सॉरी श्रेयांस, मम्मी, पप्पा अन् प्राची! घरात चिठ्ठी; एक्स्प्रेस वेवर कारमध्ये डॉक्टरची बॉडी


लखनऊ: बेपत्ता झालेल्या डॉक्टरचं शव एका दिवसानंतर इस्टर्न पेरीफेरल एक्स्प्रेस वेवर उभ्या असलेल्या एका कारमध्ये सापडलं. कार बराच वेळ एकाच जागी उभी होती. त्यामुळे कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला. तेव्हा आत ३० वर्षांच्या शिवम कार्तिकेय यांचं शव सापडलं. कारमधून बरीच इंजेक्शन आणि औषधंही सापडली. शिवम पेशानं डॉक्टर होते. त्यांचा मृत्यू ओव्हरडोसमुळे झाला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये बुधवारी इस्टर्न पेरीफेरल एक्स्प्रेस वेवर एक कार बराच वेळ उभी होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना काहीतरी शंका आली. कारमध्ये एक व्यक्ती दिसत होता. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. दुपारी अडीचच्या सुमारास पोलीस पोहोचले. पोलिसांना कारच्या आत एका व्यक्तीचं शव सापडलं. पोलिसांनी ते पोस्टमार्टमसाठी पाठवलं. मृताची ओळख पटली आहे. डॉ. शिवम कार्तिकेय असं मृताचं नाव असून तो पेशानं डॉक्टर आहे. गाझियाबादच्या राजनगर एक्सटेंशन येथील व्हीव्हीआयपी मंगल सोसायटीत शिवम त्याच्या कुटुंबासोबत राहायचा.

शिवम बेपत्ता होता. कुटुंबियांनी याबद्दल २९ सप्टेंबरला नंदग्राम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. कुटुंबीयदेखील त्याला शोधत होते. पण दुसऱ्याच दिवशी त्याचं शव एक्स्प्रेस वेवरील कारमध्ये सापडलं. कारच्या आत अनेक इंजेक्शन्स आणि औषधं सापडली आहेत. इंजेक्शन्स आणि औषधांच्याच ओव्हरडोसमुळे शिवम यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.

शिवमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. हातावर कॅनुला लावल्याची खूण दिसून आली आहे. कुटुंबियांनी कोणावरही हत्या किंवा अपहरणाचा संशय बोलून दाखवलेला नाही. त्यामुळे शिवमनं जीव दिला असण्याची शक्यता पोलिसांनी बोलून व्यक्त केली. २९ सप्टेंबरला शिवम नेहमीप्रमाणे घरातून निघाला. त्याआधी त्यानं त्याच्या ९ महिन्यांच्या बाळाचं (श्रेयांस) चुंबन घेतलं. मग तो वडिलांकडे गेला. त्यांना वाकून नमस्कार केला. शिवम घरातून निघून गेल्यावर वडिलांना दुपारी घरातील टेबलावर एक चिठ्ठी सापडली. 'सॉरी श्रेयांस, सॉरी आई-बाबा आणि प्राची,', असा मजकूर त्या चिठ्ठीत होता. यानंतर वडिलांनी शिवमला कॉल केला. पण तो बंद होता. शिवमची पत्नी प्राचीदेखील डॉक्टर आहे. शिवमच्या अकस्मात मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.