प्रसिद्ध अभिनेत्रीचा पुण्यात थरार! जबरदस्तीने कारमध्ये डांबून जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं रात्रीच्या अंधारात?
रियलिटी शो 'लॉक अप २'ची स्पर्धक आणि अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत नुकतंच एक धक्कादायक घटना घडली आहे. आकांक्षा पुण्यात एका इव्हेंटला गेली होती तिथे तिला वाईट अनुभव आला आहे. इव्हेंटच्या आयोजकांनी पेमेंट दिलं नाही शिवाय किडनॅप केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.
नेमकं काय घडलं?
आकांक्षाने दावा केला की, आयोजकांनी तिला आणि एका मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि एका मैदानात नेलं. आकांक्षा म्हणाली, "जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा समोरच मोठ्या संख्येने प्रेक्षक होते. माझ्या आणि प्रेक्षकांमध्ये फक्त एक छोटीशी बॅरिकेडिंग होती आणि माझी गाडी अगदी त्यांच्या समोर उभी करण्यात आली होती. इतक्या गर्दीत मी आत जाऊ शकत नाहीये आणि माझी टीमही माझ्यासोबत नाहीये, असं मी ओरडून सांगत होते."
आयोजकांनी तिचं ऐकलं नाही, उलट तिची खिल्ली उडवली. हा संपूर्ण प्रकार एक स्कॅम असल्याचं ती म्हणाली. आशिष नावाच्या व्यक्तीशी आपला संबंध असल्याने आपण या इव्हेंटसाठी होकार दिला होता, ज्याचा चुलत भाऊ हा इव्हेंट सांभाळत होता. मात्र, त्यानेही कोणतीही जबाबदारी घेतली नाही. आकांक्षाने संताप व्यक्त करत सांगितले, "मला एक प्रकारे किडनॅपच करण्यात आलं होतं. जेव्हा मी एकाला कानाखाली मारली तेव्हा हा सगळा प्रकार थांबला."
आकांक्षाने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या कारभोवती अनेक लोक जमलेले दिसत आहेत. तिची इच्छा नसतानाही तिला जबरदस्ती कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने सांगितले की, "त्यांनी जाणीवपूर्वक गर्दीच्या समोर गाडी थांबवली आणि दरवाजा उघडला. इतक्या गर्दीसमोर स्वतःला वाचवण्यासाठी मला कार लॉक करावी लागली."नंतर आयोजकांनी कार अशा ठिकाणी नेली जिथून पुढे रस्ता बंद होता. आजूबाजूला लोक उभे असतानाही त्यांनी पुन्हा कारचा दरवाजा उघडला. आकांक्षाने सांगितले, "ते आपापसात मराठीत बोलू लागले, जी आम्हाला समजली नाही. ते हसत-हसत आणि अत्यंत बेफिकीरपणे चर्चा करत होते की, पुढे काय करायचे आणि आम्हाला कुठे घेऊन जायचे." आकांक्षाच्या मते, आयोजक अतिशय आत्मविश्वासात होते कारण ते श्रीमंत होते आणि त्यांची राजकीय ओळख मोठी असल्याने त्यांना कायदा आपल्या हातात घेण्याची भीती वाटत नव्हती. आकांक्षाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.