🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इनाम धामणी येथे आचार्य श्री सन्मतिसागरजी महाराज यांचा १४ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात होणार; १ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

इनाम धामणी येथे आचार्य श्री सन्मतिसागरजी महाराज यांचा १४ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात होणार; १ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


इनाम धामणी (ता. मिरज): पुण्यशाली धर्मनगरी इनाम धामणी येथे चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांच्या परंपरेतील आचार्य शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर १०८ श्री सन्मतिसागरजी महाराज यांचा १४ वा भव्य पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा अश्विन कृ. रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी शुभस्थान इनाम धामणी येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

​या मंगल सोहळ्यास आगम चक्रवर्ती प.पू. १०८ अभिनव आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. तसेच निर्यापक श्रमण १०८ श्री धर्मसागरजी महाराज, मुनीश्री १०८ आगमसागरजी महाराज आणि क्षुल्लक श्री १०५ चैत्यसागर महाराज यांचीही विशेष उपस्थिती व सानिध्य असणार आहे.

​दिवसभरातील मांगलिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:

सकाळी ६.०० वा. - मंगल निनाद
​सकाळी ६.३० वा. - जिन्याभिषेक व पूजन
​सकाळी १०.०० वा. - मुनीसंघाची आहारचर्या
​दुपारी १२.०० वा. - भव्य मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी 
आगमन व प्रस्थान

​दुपारी १.०० वा. - आचार्य छत्तीसी विधान

​दुपारी ३.०० वा. - मुनीश्रींचा सत्संग व मंगल प्रवचन

​सकल दिगंबर जैन समाज इनाम धामणी यांच्या वतीने सर्व श्रावक-श्राविकांना सविनय 'जय जिनेंद्र' करून आवाहन करण्यात आले आहे की, सर्व भाविकांनी या पावन प्रसंगी उपस्थित राहून धार्मिक विधी, त्यागी महाराजांच्या मंगल प्रवचनाचा तसेच महाप्रसादाचा (भोजनाचा) लाभ घ्यावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.