"‘जनताच सर्व करणार तर कोर्ट बंद करून टाका!’ विमान प्रवाशाचा संताप अनावर, CJP च्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास"
नवी दिल्ली - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोचने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच अभिजीत दीपकेलादिल्ली विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यासोबत सौवर दास आणि आशुतोष रांकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलिसांनी संबंधित विमानात जाऊन केल्याने, इतर प्रवाशांना काही वेळ विमानातच ताटकळत बसावे लागले. यामुळे संतप्त एका प्रवाशाने अभिजीत दीपके आणि त्यांच्या आंदोलनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
"कोण अभिजीत दीपके? माहीत नाही, पण..." - या संपूर्ण घटनेसंदर्भात संबंधित विमानातील एका प्रवाशाला विचारले असता, त्यांनी संताप व्यक्त केला. तो म्हणाला, "आम्ही मुंबईहून येत होतो. विमान उतरल्यानंतरही आम्हाला थांबावे लागले. विमान उतरल्यानंतर आम्हाला विमानाच्या पुढच्या भागातून 'इंकलाब जिंदाबाद'च्या घोषणा ऐकू आल्या. दरम्यान, दीपक कोण आहे? मला माहीत नाही. कदाचित तेच 'कॉकरोच' असतील, जे असे वागत असेल. मला फार माहिती नाही."ताब्यात घेतल्यानंतर, अभिजित दीपकेला कुठे घेऊन गेले पोलीस? सौरव दास अन् आशुतोष रांका कुठे?
"...तर कोर्ट बंद करा" - ते पुढे म्हणाले, "ते (कॉकरोच) गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण याचा अर्थ त्यांनी प्रत्येक ठिकाणी गैरसोय निर्माण करावी का? अशा काही लोकांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. जर लोकांची नावे चुकीच्या पद्धतीने काढली गेली असतील, तर सर्वोच्च न्यायालय त्याची चौकशी करेल. जर जनताच सर्व काही करणार असेल तर, कोर्ट बंद करा. एका व्यवस्था आहे, जीचे आपण सर्वजन पालन करतो. ती व्यवस्थाच बंद करणार का? जर काही समस्या असेल, तर आम्ही आंदोलन करणार. याने काही फायदा होईल?" असा प्रश्नही त्यांनी केला.
पोलिसांनी दीपके, रांका, दासला विमानातच घेतले ताब्यात - कॉकरोच जनता पार्टीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, अभिजीत दीपके विमानाच्या आत आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना "आम्ही इथे अटक देण्यासाठीच आलो आहोत, या आणि आम्हाला अटक करा" असे म्हणताना दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.