🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

OIL India मधील नोकरीची ही संधी सोडू नका, 2 लाख रुपयांहून अधिक पगार

OIL India मधील नोकरीची ही संधी सोडू नका, 2 लाख रुपयांहून अधिक पगार


सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख नवरत्न कंपनी 'ऑइल इंडिया लिमिटेड' (Oil India Limited) विविध पदांच्या 32 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीअंतर्गत सुपरिंटेंडिंग रिसर्च सायंटिस्ट, सीनियर ऑफिसर, हिंदी ऑफिसर आणि कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी अशा विविध महत्त्वाच्या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2026 आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी उमेदवारांचे शैक्षणिक निकष पदानुसार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree), पदव्युत्तर पदवी (Post Graduation - PG), पीएचडी (Ph.D.), आयसीएआय / आयसीएमएआय (ICAI / ICMAI) किंवा संबंधित विषयातील डिप्लोमा धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वयोमर्यादा 27 ते 37 वर्षे (खुला प्रवर्ग) दरम्यान असणे आवश्यक असून, शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत लागू राहील.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रक्रिया संगणकावर आधारित चाचणी (CBT) आणि त्यानंतर मुलाखत किंवा कौशल्य चाचणी (Skill Test) याद्वारे केली जाईल. संगणक आधारित चाचणीची (CBT) संभाव्य तारीख 28 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी सर्वसाधारण (GEN) आणि ओबीसी-एनसीएल (OBC-NCL) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क राहील, तर इतर सर्व पात्र/राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. 




पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आणि ग्रेडनुसार 50,000 ते 2,20,000 या वेतनश्रेणीमध्ये आकर्षक वेतन दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता www.oil-india.com या ऑइल इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी आणि ऑनलाईन अर्ज भरावा.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.