🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! कोल्हापुरात खळबळ! गोकुळच्या निवडणूक अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; थेट मराठवाड्यात नियुक्ती, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

Big Breaking! कोल्हापुरात खळबळ! गोकुळच्या निवडणूक अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; थेट मराठवाड्यात नियुक्ती, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?


कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून अध्यक्ष निवडीपर्यंत घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांची पदोन्नतीने झालेली बदली चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी बदलीचे आदेश निघाले असून छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. 



गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला असून, या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे या बदलीमागे प्रशासकीय कारणे आहेत की गोकुळच्या राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले आहे.



मोसमी चौगुले या गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. निवडणूक जाहीर अर्ज झाल्यापासून उमेदवारी छाननी, माघारी, मतदान मतमोजणीपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी त्यांच्या कार्यकाळात घडल्या. अध्यक्ष निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला. समविचारी आघाडीने निवडीच्या प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. या याचिकेमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनाही निर्णय प्रतिवादी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी चौगुले यांच्या पदोन्नती आणि बदलीचे आदेश जारी झाले. त्यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) पदावर पदोन्नती देऊन छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 




सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, त्या सध्या निवडणुकीसाठी अधिसूचित पदावर कार्यरत असल्याने विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना सध्याच्याच पदावर काम करावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच त्यांना नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होता येणार आहे.

राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच न्यायालयात असताना आणि या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका न्यायालयीन प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असताना त्यांची दूरवर झालेली बदली अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. 




बदलीचे आदेश सुट्टीच्या दिवशी निघाल्याने या निर्णयाला राजकीय संदर्भ जोडले जात आहेत, अर्थात, शासनाने ही बदली पदोन्नतीच्या प्रक्रियेतून केल्याचे आदेशात नमूद केले असले, तरी तिच्या वेळेबाबत आणि पार्श्वभूमीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.