बांगलादेशातील झोपडपट्ट्यांचे व्हिडिओ बनवून भारताचे नाव : चिनी व्लॉगर्सच्या व्हिडिओंमध्ये खळबळ भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलीन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारा एक प्रकार बांगलादेशची राजधानी ढाका येथे समोर आला आहे.
ढाक्यातील गरीब वस्त्या, अऊंद रस्ते आणि चहाच्या दुकानांमध्ये चित्रिकरण करून हे व्हिडिओ भारतातील, विशेषत: नवी दिल्लीतील असल्याचे भासवले जात असल्याचा आरोप आहे. या व्हिडिओंमध्ये भारतीयांच्या राहणीमानाबाबत अपमानास्पद टिप्पण्याही केल्या जात असल्याचे वृत्त बांगलादेशमधील "प्रोथोम आलो" या वृत्तपत्राने दिले आहे.
"प्रोथोम आलो"च्या तपास अहवालानुसार, ढाक्मयातील उत्तरा सेक्टर 12 आणि टेकपारा परिसरात अनेक चिनी नागरिक गेल्या काही महिन्यांपासून व्हिडिओ तयार करत आहेत. अशा प्रकारे चित्रीकरण करणाऱ्यांची संख्या सुमारे 150 असू शकते. हे नागरिक सकाळपासून रात्रीपर्यंत रस्त्यांवर, दुकानांमध्ये आणि वस्त्यांमध्ये फिरून लाइव्ह व्हिडिओ प्रसारित करतात. हे व्हिडिओ चीनमधील वीचॅट आणि डोयुविन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवले जात आहेत.
ढाक्याला सांगताहेत नवी दिल्ली!
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे बांगलादेशातील परिसर भारताची राजधानी नवी दिल्ली असल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप आहे. "मियांमियां" नावाच्या एका चिनी महिला व्लॉगरने उत्तरा सेक्टर 12 मधील परिसराचे थेट प्रक्षेपण करताना ही जागा नवी दिल्ली असल्याचे सांगितले. येथील घरे अस्वच्छ असून, काही घरांमध्ये पंखेही नसल्याची टिप्पणी तिने केली आहे.
तसेच टेकपारा परिसरात चित्रीकरण करणाऱ्या "वांग वेई" नावाच्या व्यक्तीने स्थानिक नागरिकांच्या चहाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले आहे. स्थानिक लोक गोमूत्रापासून बनविलेला चहा पित असल्याचा दावा त्याने व्हिडिओमध्ये केला आहे. या टिप्पण्यांमुळे केवळ बांगलादेशातील रहिवाशांचीच नव्हे, तर भारतीयांचीही दिशाभूल होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.
उत्पादनांच्या जाहिरातीसाठी व्हिडिओ बनवत असल्याचा दावा
या चित्रीकरणामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. 'फांगयू" नावाच्या एका चिनी नागरिकाने पत्रकारांशी संवाद साधताना हे व्हिडिओ उत्पादनांच्या जाहिरातीसाठी तयार केले जात असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी ढाक्मयातील गरीब वस्त्यांचीच निवड का केली, याचे स्पष्टीकरण त्याने दिले नाही. त्यामुळे या व्हिडिओंच्या उद्देशाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्थानिकांच्या खासगी आयुष्यालाही धोका
या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या गोपनीयतेचा प्रŽही ऐरणीवर आला आहे. काही चिनी व्लॉगर्स परवानगी न घेता नागरिकांच्या घरांमध्ये प्रवेश करून चित्रीकरण करत असल्याच्या तक्रारी आहेत. काही जण स्वयंपाकघरात, तर काही जण बाथरूमपर्यंत पोहोचून व्हिडिओ तयार करत असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये नाराजी असून, त्यांच्या खासगी आयुष्याचा व्हिडिओंच्या माध्यमातून वापर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक महिलांना पैशांचे आमिष?
या चित्रीकरणासाठी काही स्थानिक महिलांची मदत घेतली जात आहे. एका स्थानिक मार्गदर्शक महिलेने चिनी नागरिकांना परिसर दाखविण्याच्या बदल्यात दररोज 700 ते 800 बांगलादेशी टका मिळत असल्याचे सांगितले. काही महिलांना 500 ते 1,000 टकांपर्यंत पैसे दिले जात असल्याचेही समजते.
पोलिसांनाही माहिती; मात्र उद्देश अस्पष्ट
या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचली आहे. उत्तरा वेस्ट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी परिसरात चिनी नागरिकांना व्हिडिओ तयार करताना पाहिल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांच्या चित्रीकरणामागील नेमका उद्देश समजलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चीनकडून भारताविरोधात दुष्प्रचार?
या प्रकरणामुळे भारताविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, हे व्हिडिओ एखाद्या संघटित प्रचार मोहिमेचा भाग आहेत किंवा त्यामागे चीन सरकारचा सहभाग आहे, याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. चिनी नागरिकांकडून स्वतंत्रपणे कंटेंट तयार केला जात आहे की यामागे कोणती संघटना कार्यरत आहे, हेही स्पष्ट झालेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.