मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेऊन दूर करावी, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना दिला असल्याची चर्चा सुरू होती.
या माहितीत तथ्य आहे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हाती काहीही लागले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींबाबत भारतीय जनता पक्षामध्ये चिंता पसरली असल्याचे मानले जाते.
मित्रपक्षातील घडामोडींनी भाजप अस्वस्थ
महायुतीतील क्रमांक दोनचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या महत्त्वाकांक्षा आणि क्रमांक तीनवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील धुसफुस या दोन्ही गोष्टींमुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला असल्याचे बोलले जाते आहे.
'गोकुळ'मध्ये मताधिकारासह तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीचे संकेत; सत्ता काबीज करण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी अमित शहा यांचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी अत्यंत उत्तम संबंध आहेत. सुनेत्रा पवार यांनी पक्षात अधिक लक्ष द्यावे हा निरोप त्यांना खरंच दिला गेला काय, असे विचारले असता ही शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांच्या एका समर्थक आमदारातर्फे सांगितले गेले.
ज्येष्ठांची नाराजी शहांना सांगितली
मंगळवारी प्रफुल्ल पटेल मुंबईत होते, मात्र त्यांनी कोणालाही भेटणे टाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. तेव्हा ज्येष्ठांच्या नाराजीचा विषय स्वतः पार्थ यांनी काढला होता.
त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्वतः अमित शहा यांना विनंती करून या प्रकरणात लक्ष घालावे, असे सांगितल्याचीही जोरदार चर्चा आहे. सुनेत्रा पवार अमित शहा यांना राखी बांधतात. त्यामुळे ही बहिणीने भावाला मागितलेली मदत असल्याचीही भावनिक जोड त्याला दिली जात होती.
राजकारणाचा पोत बिघडू नये म्हणून...
राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बिघडू नये. या पक्षातील सर्व घटकांनी मदत न केल्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये निर्णय विरोधात गेले, अशी भूमिकाही व्यक्त केली गेली आहे.
सुनेत्रांच्या सल्ल्यानेच दिल्लीभेट
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या सल्ल्यानुसारच या जेष्ठ मंत्र्यांना दिल्लीत बोलावले गेले होते, असेही सांगितले जाते आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी मंत्री हसन मुश्रीफ यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांचाही या शिष्टमंडळात समावेश असल्यामुळे या सर्व घडामोडी सुनेत्रा पवार यांच्या सल्ल्यानुसारच केल्या गेल्या असेही मानले जाते .अजित पवार यांच्या सर्वाधिक जवळचे नेते मानले जाणारे कृषिमंत्री दत्ता भरणे यांचाही शिष्टमंडळातला समावेश हे कशाचे निदर्शक मानायचे, असा प्रश्न करत ही भेट सुनेत्रा पवार यांच्या निर्देशानुसार झाली होती, अशीही माहिती दिली जाते आहे.
चर्चा जोरात; पण नेत्यांचे मौन
त्याच पार्श्वभूमीवर पक्षातील वाद निकालात काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीचे सर्वाधिक महत्त्वाचे क्रमांक दोनचे नेते या न्यायाने सुनेत्रा पवार यांनी पक्षात लक्ष घालावे असा सल्ला दिला आहे काय, याचीही आज दिवसभर चर्चा सुरू होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मौन बाळगत कोणत्याही विषयावर थेट संवाद करणे टाळले. रात्री होणाऱ्या आमदारांच्या बैठकीनंतरच बोलणे उचित ठरेल, असे या पक्षातर्फे सांगितले जात होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.