🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपा प्रदेशcellप्रमुख मकरंद देशपांडे (भाऊ) यांची सांगलीतील 'आदितत्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'ला सदिच्छा भेट; रुग्णांची आस्थेने केली विचारपूस​

भाजपा प्रदेशcellप्रमुख मकरंद देशपांडे (भाऊ) यांची सांगलीतील 'आदितत्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'ला सदिच्छा भेट; रुग्णांची आस्थेने केली विचारपूस


​सांगली :- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रकोष्ठ प्रमुख मा. श्री. मकरंद देशपांडे (भाऊ) यांनी सांगलीतील विश्रामबाग येथील 'आदितत्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'ला सदिच्छा भेट देऊन संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील विविध अत्याधुनिक विभागांची पाहणी करत तेथील आरोग्य सुविधांची बारकाईने माहिती घेतली.

​हॉस्पिटलमधील विविध कक्षांना भेट देऊन मकरंद देशपांडे यांनी उपचाराधीन रुग्णांची अत्यंत आस्थेने विचारपूस केली. रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांचा आढावा घेत असताना, गरजू व वंचित रुग्णांना आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.



​सांगली व परिसरातील नागरिकांना हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्युत्कृष्ट व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचे मकरंद देशपांडे (भाऊ) यांनी मनापासून कौतुक केले.  तसेच, आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस व आरोग्यविषयक उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




​मा. मकरंद देशपांडे यांच्या या उत्स्फूर्त आणि प्रोत्साहनपर भेटीमुळे आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर, परिचारिका व सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह, ऊर्जा व काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.  भेटीनंतर आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने व संपूर्ण टीमने मा. मकरंद देशपांडे (भाऊ) यांचे मनःपूर्वक आभार मानले.
​
आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
मेन चौक, विश्रामबाग, सांगली





​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.