🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिगारेटच्या किमतीत मोठी वाढ! Gold Flake चं एक पाकीट आता ८ टक्क्यांनी महागलं.

सिगारेटच्या किमतीत मोठी वाढ! Gold Flake चं एक पाकीट आता ८ टक्क्यांनी महागलं.


सिगारेट शौकिनांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. ITC कंपनीने आपल्या लोकप्रिय Gold Flake सिगारेटच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. Gold Flake RSFT (69 mm) या प्रकारासाठी आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Gold Flake RSFT (69 mm) च्या एका पाकिटामागे कंपनीने थेट 10 रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वी 125 रुपयांना मिळणारे हे पाकीट आता 135 रुपयांना विकले जाणार आहे. या दरवाढीमुळे सिगारेटच्या किमतीत जवळपास 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.




सिगारेट महागण्यामागे केंद्र सरकारने तंबाखू उत्पादनांवरील कर रचनेत केलेला बदल महत्त्वाचा मानला जात आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर 40 टक्के GST आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला असून त्याचा परिणाम आता विक्रीच्या किमतींवर दिसत आहे. 



Gold Flake हा देशातील मोठ्या प्रमाणावर विकला जाणारा सिगारेट ब्रँड असल्याने या दरवाढीचा परिणाम अनेक ग्राहकांवर होणार आहे. नियमित सिगारेट खरेदी करणाऱ्यांना महिन्याला साधारण 300 ते 600 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर आणखी ताण येणार आहे.




करवाढीचा भार ग्राहकांकडे वळवल्यामुळे ITC कंपनीला आपले नफ्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. Gold Flake च्या दरवाढीनंतर इतर तंबाखू कंपन्याही आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात, असा बाजारातील जाणकारांचा अंदाज आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.